पुणे शहर : मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजनेची अंमलबजावणी करा, वाचा सविस्तर

णे ता. २२ : मुलींना एक जूनपासून मोफत उच्च शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा करण्यात आली. परंतु जून महिना अर्धा संपला तरीही अंमलबजावणी झाली नाही. या योजनेची राज्य सरकारने त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी भूमाता महिला संघटनेने बुधवारी पत्रकार परिषदेत केली.
महाविद्यालयांच्या भरमसाट शुल्कामुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते. किंबहुना शाळा सोडावी लागते. परभणीमध्ये गतवर्षी एका मुलीने महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली होती. त्याची दखल घेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ फेब्रुवारीला ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, विधीसह इतर ६६२ कोर्सेससाठी कोणतेही शुल्क आकारणार नाही. मोफत शिक्षण देणार असल्याची घोषणा केली होती. या योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भूमाता संघटनेने दिला आहे.