पुणे: CBI चा धडाका: वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी वकिलांविरोधात गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण
पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सादर केलेल्या पेन ड्राईव्हमुळे, सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सरकारी वकील प्रविण चव्हाण, तत्कालीन पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण आणि विजय पाटील यांच्याविरुद्ध कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
फडणवीस यांनी भाजप नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा आरोप केला होता. त्यांनी यावेळी पुरावा म्हणून एक पेन ड्राईव्ह सादर केली होती. त्यानंतर शिंदे सरकार सत्तेत आल्यावर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
या व्हिडिओमध्ये सरकारी वकील प्रविण चव्हाण भाजप नेत्यांना गुन्ह्यात अडकविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत कट रचताना दिसत आहेत. तसेच, त्यांनी खोटे तक्रारी तयार करणे, साक्षीदारांना शिकविणे, आणि तपासात हस्तक्षेप केल्याचे आरोप आहेत.