पुणे: दुभाजकावर धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू: येरवड्यातील कॉमरझोन आयटी पार्क रस्त्यावरील घटना

0
4-wheelers_202404061753571853_H@@IGHT_400_W@@IDTH_600.jpg

पुणे – येरवड्यातील काॅमरझोन आयटी पार्क रस्त्यावर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. आदित्य प्रमोद सावंत (रा. पांचाळ बिल्डिंग, आळंदी रस्ता, कळस) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

सोमवारी मध्यरात्री आदित्य हा काॅमरझोन आयटी पार्क रस्त्यावरून दुचाकीवरून भरधाव वेगाने जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात आदित्य गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी फिर्याद दिली असून पोलीस कर्मचारी जाधव पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed