पुणे: आंदेकर हत्याप्रकरणात बहीण अन् दाजी ‘प्यादे’, मास्टर माईंडबद्दल मोठा खुलासा

0

पुणे: काही दिवसांपूर्वी पुणे शहर गोळीबाराच्या घटनेने हादरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार करून धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आता या प्रकरणात पोलिस तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आंदेकर यांच्या हत्येचा मुख्य उद्देश पूर्ववैमनस्य आणि बदला असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांना संशय आहे की, सोमनाथ गायकवाड या घटनेचा मुख्य सूत्रधार आहे. गायकवाडने आपल्या साथीदार निखिल आखाडेच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच वनराज आंदेकर यांचा खून केल्याचे समोर आले आहे.

ऑक्टोबर २०२३ मध्ये सोमनाथ गायकवाडच्या साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहिभाते यांच्यावर झालेल्या हल्ल्यात आखाडेचा मृत्यू झाला होता. त्याच घटनेचा बदला घेण्यासाठी गायकवाडने संजीवनी, जयंत, प्रकाश, आणि गणेश कोमकर यांच्यासह संगनमत करून आंदेकर यांच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. दुसरीकडे, कौटुंबिक वाद आणि संपत्तीच्या वादातून देखील ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

या प्रकरणात पोलिस तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *