पुणे: पोलीस निरीक्षकाला लाच देण्याचा प्रयत्न फसला, हसन अली पकडला!

पुणे – गुन्ह्यामध्ये साहाय्य करावे; म्हणून साहाय्यक पोलीस निरीक्षकाला २ सहस्र रुपयांची लाच देणार्या हसन अली गुलाब बारटक्के याला रंगेहात अटक केली आहे.
ताडीवाला रस्ता पोलीस चौकीमध्ये २६ डिसेंबर या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या प्रकरणी साहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.
आरोपी हसनअली हा ‘रिअल इस्टेट एजंट’ (घर, मोकळी जागा विक्री करणारा दलाल) असून त्याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्याचे अन्वेषण तक्रारदार कदम यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात कदम यांनी साहाय्य करावे; म्हणून आरोपी लाच देण्याचा वारंवार प्रयत्न करत होता. कदम यांनी लाच न स्वीकारता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.