पुणे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळांना मोठी सुट्टी

0

महाराष्ट्र माझा न्युज| सध्या प्रथम सत्रांत परीक्षा सुरू झाल्या आहेत. साधारणतः या परीक्षा २६ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहेत. २८ ऑक्टोबरपासून शाळांना तथा विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी लागणार आहे.

माध्यमिक विभागाच्या त्यांच्या परिपत्रकानुसार १६ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी आहे, पण १७ नोव्हेंबरला रविवार असल्याने माध्यमिक शाळा १८ नोव्हेंबरपासून सुरू होतील. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना व शाळांना २१ दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे.

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या विविध संघटनांची एकत्र बैठक घेऊन शैक्षणिक सत्राच्या सुट्ट्या ठरविण्यात आल्या होत्या. विविध शाळांच्या नियोजनाप्रमाणे २६ ऑक्टोबरपूर्वी पहिल्या सत्राची परीक्षा संपणार आहे. सध्या अनेक शाळांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. दिवाळीपूर्वी होणाऱ्या पहिल्या सत्र परीक्षेपूर्वी शाळांनी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेतली आहे.सध्या तोंडी, प्रात्यक्षिक, सराव सुरू असून २६ ऑक्टोबरपर्यंत सर्वच शाळांच्या पहिल्या सत्राच्या परीक्षा संपतील, असे नियोजन करण्यात आलेआहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

‘या’ वर्षातील उर्वरित सुट्या

दिवाळी सुट्टी (२८ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर), १५ नोव्हेंबर (गुरुनानक जयंती), २५ डिसेंबर (ख्रिसमस), १४ जानेवारी (मकर संक्रांती), २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १९ फेब्रुवारी (छत्रपती शिवाजी महाराज जयंती), २६ फेब्रुवारी (महाशिवरात्री), १४ मार्च (धूलिवंदन), १९ मार्च (रंगपंचमी), ३० मार्च (गुढीपाडवा, रमजान ईद), ६ एप्रिल (रामनवमी), १० एप्रिल (महावीर जयंती), १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती), १८ एप्रिल (गुडफ्रायडे), १ मे (महाराष्ट्र दिन), २० मे ते २५ जून (उन्हाळा सुट्टी), २६ जूनपासून पुढच्या नवीन सत्राची सुरुवात होईल.———–

—————

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *