पुणे: हांडेवाडीतील २५ ते ३० वाहनांची तोडफोड; दहशत माजवणारे टोळके पोलिसांच्या ताब्यात – व्हिडिओ

IMG_20251124_132614.jpg

पुणे : हांडेवाडी परिसरातील आदर्श नगर येथे सुमारे २५ ते ३० वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्याला फुरसुंगी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पहा व्हिडिओ

Link source: dcn news
Link source: news dotz

तोडफोडीच्या प्रकारानंतर परिसरात पसरलेली दहशत लक्षात घेऊन पोलिसांनी स्थानिक नागरिकांना थेट विश्वासात घेतले. नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था कायम असल्याचा मजबूत संदेश देण्यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या टोळक्याला भर रस्त्यातच ‘टायर थेरपी’ दिली.

या प्रकरणाबाबत कोणाकडे अधिक माहिती असल्यास किंवा साक्ष देण्याची इच्छा असल्यास पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्याने नागरिकांना सहकार्याची विनंती केली असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

Spread the love

You may have missed