एआय’ च्या माध्यमातून पोलीस दल अधिक प्रभावशाली, कार्यक्षम होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती.

0

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दल अधिक प्रभावशाली आणि कार्यक्षम करण्यासाठी आता ‘एआय’चा वापर करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, नागपूर यांच्या सोबत एक प्रोजेक्ट तयार करण्यात आला असून या माध्यमातून गुन्ह्यांची उकल तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखणे, वाहतूक व्यवस्थापनसाठी याचा वापर करता येणार असल्याची माहिती आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली.
  

या संदर्भात एक मॉडेल तयार करण्यात आले असून त्याचे प्रेझेंटेशन आज पोलीस दलातील काही प्रमुख अधिकाऱ्यासमोर करण्यात आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, यामध्ये आम्ही सरकारची एक कंपनी तयार केली आहे. ही कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग हा कायदा सुव्यवस्था करिता, गुन्ह्याची उकल करण्यासाठी करेल.

याशिवाय देशातले सर्वात आधुनिक सायबर डीटेक्शन सेंटर आपण महापे, नवी मुंबई येथे तयार करत आहोत. ते लवकरच सुरु होत आहे. या सर्व व्यवस्थेतून देशातले एक आधुनिक पोलीस दल हे महाराष्ट्राचे होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *