पुणे : ऑर्चिड इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक अध्यक्ष जे. डिकाेस्टा, संचालक समीर गाेरडे, मुख्याध्यापिका अनिता नायर यांच्यावर गुन्हा दाखल

0

पुणे : उंड्री परिसरातील ईरा एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलने पहिली ते दहावी इयत्तेचे अनधिकृत वर्ग चालवून विद्यार्थ्यांचा प्रवेश करून शासन आणि पालकांची फसवणूक केल्याने संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलिस ठाण्यात ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जे. डिकोस्टा (रा. बंगळुरु), संचालक समीर गोरडे (रा. विमाननगर, पुणे) आणि मुख्याध्यापिका अनिता नायर यांच्यावर भा.द.वि. कलम ३१८ (४), ३३६(२), ३३६ (३) व ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी संगनमताने उंड्री भागात ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल सुरू केले होते.

उंड्री परिसरातील ईरा एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलने पहिली ते दहावी इयत्तेचे अनधिकृत वर्ग चालवून विद्यार्थ्यांचा प्रवेश करून शासन आणि पालकांची फसवणूक केल्याने संस्थेचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देऊन अनधिकृत वर्ग चालवले. अधिकृत वर्ग चालवण्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी किंवा मान्यता न घेता बेकायदेशीररित्या शाळा चालवण्यात आली. पालकांकडून अनधिकृतपणे फी वसूल करून विद्यार्थी व पालकांची फसवणूक करण्यात आली. सदरची शाळा अनधिकृत असूनही इतर शाळांना दाखला मागणी करणे, विद्यार्थ्यांचे दाखले देणे, विद्यार्थ्यांचे मूळ जन्मप्रमाणपत्र अनधिकृतरित्या ताब्यात घेणे, अनधिकृतरित्या जनरल रजिस्टर क्रमांक एकमध्ये नाव नोंदणी करणे, विद्यार्थी उपस्थिती पत्रक तयार करणे, शाळेला शासन मान्यता नसतानाही ती असल्याचे भासवणे आदी बाबी शाळेने केल्या आहेत. सदरची शाळा अनधिकृत असल्याने शासनास आवश्यक असलेला महसूल बुडवून शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed