New Aadhaar App: नवीन आधार अ‍ॅप कसे वापरायचे, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

0
n660045637174460661978974320f0f5ad5d985a2d45e5feccf7e796899563db1d1a758ea53ec148ec8012a.jpg

New Aadhaar App : डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळात जिथे पेमेंटपासून ते हॉटेलमधून जेवन ऑर्डर करण्यापर्यंत सर्व काही ऑनलाइन झालं आहे. आता प्रत्येक काम अगदी काही सेंकदात होत आहे. त्यामुळे नागरिकाचा वेळ आणि त्रास कमी झाला आहे.

या ऑनलाईनच्या काळात नागरिकांचे अजून एक काम सोपे होणार आहे.

सरकारने एक नवीन आधार अ‍ॅप लाँच केले आहे, जे तुमची ओळख सुरक्षित ठेवेल आणि सर्वत्र पडताळणी सुलभ करेल. आता तुम्हाला तुमच्या पर्समध्ये आधार कार्डची मूळ प्रत किंवा फोटो कॉपी बाळगण्याची गरज नाही. तुमची माहिती शेअर करण्याचे सर्व काम फक्त एका टॅपमध्ये होईल.

आधार अ‍ॅप कसे वापरावे?

केंद्र सरकारने काल म्हणजेच 8 एप्रिल 2025 रोजी एक आधारकार्ड अ‍ॅप लाँच केले आहे. याद्वारे आधारकार्डचा दुरुपयोग रोखला जाणार असून यासह इतर महत्वपुर्ण उद्देश समोर ठेवून सरकारने आधारकार्ड अ‍ॅप आणलं आहे. हे अ‍ॅप अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने, अनेकांना ते कसे वापरायचे हे माहित नसेल. नेमके अॅप कसे वापरायचे ते स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.

बऱ्याच वेळा तुम्हाला फक्त तुमचा आधार क्रमांक, पत्ता किंवा जन्म तारीख तारीख विचारली जाते. आधार अ‍ॅपच्या आधी तुम्हाला संपूर्ण आधार कार्ड दाखवावे लागत असे. आता या अ‍ॅपवर यूजरचे पूर्ण नियंत्रण असणार आहे. आता तुम्हाला आधारची संपूर्ण माहिती शेअर करावी लागणार नाही तर मागितलेली माहिती या अ‍ॅपवरून फक्त एका टॅपने शेअर करता येईल.

क्यूआर कोडद्वारे त्वरित पडताळणी होईल

या अ‍ॅपमध्ये क्यूआर कोड स्कॅनिंग फीचर देखील आहे. जे यूपीआय पेमेंटसारखेच काम करेल. लवकरच हे QR कोड हॉटेल्स, विमानतळ, रेल्वे स्थानके यांसारख्या ठिकाणी बसवले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ओळखीचा पुरावा देण्यासाठी आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी तुमचा वेळ वाचेल. आता यूजरला फक्त अ‍ॅपमधून QR कोड स्कॅन करायचा आहे. यानंतर अ‍ॅपमधील चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे तुमची ओळख त्वरित पडताळली जाईल.

पेपरलेस पडताळणी

आतापर्यंत प्रवास किंवा हॉटेल बुक करताना किंवा कोणतीही सेवा वापरताना आपल्या अनेकदा आधारची फोटो प्रत मागितली जात असे. पण आता या अ‍ॅपद्वारे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आधार तपशील डिजिटल पद्धतीने शेअर करू शकता. यामुळे केवळ सोयच होणार नाही तर तुमची माहितीही सुरक्षित राहणार आहे.

बनावट आधार सारखे घोटाळे रोखता येणार

UIDAI च्या या नवीन अ‍ॅपमध्ये गोपनीयतेची खूप काळजी घेण्यात आली आहे. यूजरची माहिती परवानगीशिवाय शेअर केली जाणार नाही आणि ती फोटोशॉप किंवा एडिट करणे सुध्दया शक्य होणार नाही. या अ‍ॅपद्वारे आता बनावट आधार सारखे घोटाळे रोखता येणार आहेत.

फेस स्कॅन

हे अ‍ॅप फेस स्कॅन सारख्या सोप्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. तंत्रज्ञानाचे जास्त ज्ञान नसलेल्या लोकांना देखील ते सहज वापरता येईल. गाव असो वा शहर QR कोडद्वारे तुम्ही कधीही, कुठेही पडताळणी करणे शक्य होईल.

आधार अ‍ॅप कधीपासून वापरता येणार?

सध्या हे नवीन आधार अ‍ॅप बीटा टेस्टिंग म्हणजेच ट्रायल मोडमध्ये चालू आहे. सर्वप्रथम ते ‘आधार संवाद’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या किंवा सुरुवातीपासून सामील झालेल्या यूजरकर्त्यांना देण्यात आले आहे. UIDAI ने म्हटले आहे की, या लोकांकडून आणि इतर सिस्टम-संबंधित भागीदारांकडून मिळालेल्या फिडबॅकचा विचार करून अॅपमध्ये सुधारणा केली जाईल. फिडबॅक मिळाल्यानंतर, हे अ‍ॅप लवकरच सर्वांसाठी लाँच केले जाणार आहे.

नवीन आधार अ‍ॅप कसे डाउनलोड करायचे?

हे नवीन अ‍ॅप सध्या ट्रायल मोडमध्ये आहे. त्यासोबतच हे अ‍ॅप काही ठराविक यूजर्ससाठी उपलब्ध आहे. या अ‍ॅपचा वापर करणाऱ्या यूजर्सकडून फिडबॅख मिळाल्यानंतर UIDAI अधिकृत प्लॅटफॉर्मवर लोकांसाठी ते लाँच करेल. ते गुगल प्ले स्टोअर अँड्रॉइडसाठी आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर (आयओएससाठी) वरून डाउनलोड करता येईल.

Spread the love

Leave a Reply