साताऱ्यात चमत्कार: मातेच्या कुशीत विसावली सात बाळं; गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला टक्कर

0
n68097885117578279358588d1a98ae738f08d09975caa8623018d0197ca8d92e01c633ae8d8300b9a4723e.jpg

सातारा : साताऱ्यातून एक विलक्षण घटना समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात झालेल्या प्रसूतीने डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सर्वांनाच थक्क करून सोडले आहे. एका मातेच्या पोटी तब्बल सात बाळं जन्माला आली असून या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास खाकुर्डिया (वय 27) हिने शुक्रवारी संध्याकाळी एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. त्यात तीन मुली व एक मुलगा आहे. यापूर्वी तब्बल पाच वर्षांपूर्वी काजलला तीन जुळी बाळं झाली होती. म्हणजेच तिच्या आयुष्यात आजवर सात बाळांचा जन्म झाला आहे.

गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या विकास खाकुर्डिया यांचे कुटुंब सध्या सासवड येथे गवंडी म्हणून वास्तव्यास आहे. त्यांच्या घरी आता सात देवदूतांचा गोड गोंगाट सुरू झाला आहे.

अवघड अशी ही डिलिव्हरी सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली. डॉ. देसाई, डॉ. सलमा इनामदार, डॉ. खडतरे, डॉ. झेंडे, डॉ. दिपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने अपार मेहनत घेऊन आई व सर्व बाळांना सुखरूप बाहेर काढले. सध्या आई व सर्व बाळं ठणठणीत असून रुग्णालयात आनंदमय वातावरण आहे.

सुरुवातीला थोडी धाकधूक होती; मात्र सिझेरियन यशस्वी झाल्याने डॉक्टरांसह नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास टाकला. एका मातेच्या पोटी एवढ्या संख्येने बाळं जन्माला आल्याने ही घटना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला टक्कर देईल, अशी चर्चा साताऱ्यात रंगली आहे.


Spread the love

Leave a Reply