पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मैंदर्गीकरांचा नगरपरिषदेवर धडक मोर्चा – व्हिडिओ
अक्कलकोट (प्रतिनिधी) दि. २९ – मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथे पाण्याच्या टंचाईने नागरिक त्रस्त आहेत. भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध असताना नगरपरिषदेच्या नियोजनातील कमतरतेमुळे जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत मैंदर्गीतील नागरिकांनी कर निरीक्षक भगवत पवार यांना निवेदन सादर केले आहे.
या वेळी उद्योजक नागण्णा दुर्गी, बसवराज गोब्बुर, नीलकंठ मेंठे, काशिनाथ जकापुरे, इस्माईल आळंद, परमेश्वर दुर्गी, कैलास भत्ता, राजकुमार आरेनवरू यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.