Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, अनेकांवर थेट कारवाई, गुन्हे दाखल; जाणून घ्या प्रकरण

0
n650230181173857673766943c9286995aaa8079718e31f33b475a2d7ea14271b95eeeabb5763c7a9461ede.jpg

लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही संबंध राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. कधी त्यामधील लाभावरुन, कधी निधीत वाढ करण्याबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनावरुन तर, कधी योजनेच्या निकषांवरुन.

मात्र, आता ही योजना चर्चेत आली आहे ती काहीशा वेगळ्याच कारणावरुन. त्याचे कारण असे की, योजनेचा लाभ मिळवताना निकषांच्या मर्यादांचे उल्लंघन, गैरप्रकार (Ladki Bahin Yojana Corruption) केल्याचे पुढे आले आहे. ज्यामुळे राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या महिला आणि त्यांना तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न, मदत करणारी मंडळी राज्य सरकाच्या रडारवर आली आहेत.

पाठिमागील काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते की, महाराष्ट्राबाहेरीलही काही महिलांनी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे. शिवाय, योजनेतही काहींनी गैरप्रकार केला. राज्य सरकारच्या तिजोरीतील पैशांवर डल्ला मारला आहे. असा सर्व मंडळींवर कारवाई करण्यात येत असून, अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले आहे.

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून आतापर्यंत एकूण सात हप्ते विरीत केले आहेत. यासात हप्त्यांच्या माध्यमातून लाभार्थि महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळाले आहेत. प्रतिमहिना प्रत्येकी 1500 रुपये इतक्या निधीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीतून आतापर्यंत योजनेसाठी पात्र असलेल्या 21 ते 60 वयोगटातील महिलांच्या बँक खात्यावर आतापर्यंत 10 हजार 500 रुपये जमा झाले आहेत.

ही रक्कम सात महिन्यांमधील आहे. महत्त्वाचे असे की, या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडतो आहे. इतका की, ही योजना राबविण्यासाठी सरकारला निधीची जमवाजमव करावी लाग आहे. प्रसंगी काही विभागांच्या निधीलाही कात्री लावावी लागत आहे.

त्याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या निधींवरही झाला असल्याचे वृत्त आहे. असे असतानाच काही अपप्रवृतींचा या योजनेत शिरकाव झाला आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यानेही सरकारी तिजोरीवर भार वाढला आहे. अशांवर कारवाई करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या नावाखाली झालेली अपप्रवृत्तींची घुसखोरी खपवून घेतली जाणार नसल्याचा थेट इशारा दिला आहे. या योजनेतही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे समोर आल्यावर राज्य सरकार खडबडून जागे झाले. त्यानंतर सरकारने तातडीने कार्यवाहीस सुरुवात केली आहे.

अनेकांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे सांगितले की, ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आला आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसांत रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून, सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

महिला व बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे”. दरम्यान, लाडकी बहीण योजना कायम ठेवण्यात येणार असल्याचे राज्य सरकार सतत सांगत आहे. शिवाय या योजनेच्या माध्यमातून प्रतिमहिना दिल्या जाणाऱ्या 1500 रुयांमध्ये वाढ करुन ही रक्कम 2100 रुपये केली जाणार असल्याचेही सरकारने म्हटले होते. त्यावर निर्णय कधी घेतला जाणार याबाबत उत्सुकता आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed