येरवडा चिमा गार्डन विसर्जन घाटावर नागरिकांची गैरसोय; ५ लाख निधीचा वापर कुठे?

0
20250828_60447pmByGPSMapCamera.jpg

पुणे : गणेशोत्सवातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे विसर्जन. भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पुणे महानगरपालिकेने यंदा येरवडा चिमा गार्डन विसर्जन घाटासाठी तब्बल ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, त्या निधीचा उपयोग नेमका कुठे झाला हा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

सध्या घाटावरील परिस्थिती पाहता, रंगरंगोटी अर्धवट, सभामंडप अपूर्ण, बसण्याच्या बाकड्यांवर घाण, तर शौचालयात दिव्यांची सोयच नाही, अशी अवस्था आहे. शिवाय, भाविकांना तातडीच्या संपर्कासाठी लागणारे पोलीस, अग्निशमन दल किंवा आपत्कालीन क्रमांक लिहिलेली फलकं सुद्धा लावण्यात आलेली नाहीत.

पाहा व्हिडिओ

यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांनाच हे काम नेमकं कोणाला दिलं आहे, याचीच माहिती नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच प्रशासनातील नियोजन आणि देखरेख पूर्णपणे ढिसाळ असल्याचे स्पष्ट होते.

गणपती विसर्जनाच्या प्रमुख दिवसांना अजून काही दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे नागरिकांनी “उशीर झाला तरी चालेल, पण सुविधा पूर्ण व्हाव्यात” अशी मागणी केली आहे. अन्यथा लाखोंचा निधी खर्च होऊनही विसर्जन घाटावर भाविकांना त्रास सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

Spread the love

Leave a Reply