सेवांतर्गत आश्वासित योजनेचा पहिला लाभ निर्गमित न झाल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणे येथे इमाम नजीर मिर्झा यांचे बेमुदत धरणे आंदोलन..
प्रतिनिधी पूणे दि. १६ जूलै २०२४ सेवांतर्गत आश्वासित योजनेचा पहिला लाभ निर्गमित न झाल्याने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पूणे येथे इमाम नजीर मिर्झा यांनी आज पासून बेमुदत धरणे आंदोलन सूरू केले आहे.
उपरोक्त विषयास अनुसरून इमाम मिर्झा यांनी मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, व मा. आयुक्त (शिक्षण) पुणे, तसेच मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन, व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड जि. लातूर यांना निवेदणना द्वारे कळविण्यात आलेले आहे.
या निवेदनात ते म्हणतात की मी ( इमाम मिर्झा ) संदर्भिय अर्ज देवून सेवांतर्गत आश्वासित योजनेचा पहिला लाभ निर्गमित करणे बाबत मान्यवर मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना विनंती केली होती. सदरील संदर्भिय अर्जाची प्रत वरिल मान्यवरांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव सादर केली होती. परंतु सदरील माझ्या अर्जावर आजपर्यंत काहीही कार्यवाही झालेली नाही. माझ्या समकक्ष इतर अधिकारी यांना सेवांतर्गत आश्वासित योजनेचा पहिला लाभ मान्यवर मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी याअगोदरच दिलेले आहेत. माझा सेवांतर्गत आश्वासित योजनेचा पहिला
लाभ मिळणे बाबतचा प्रस्ताव विहित प्रशासकिय मार्गाने मान्यवर मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे सादर केला आहे. मी सेवांतर्गत आश्वासित योजनेचा पहिला लाभ मिळणे बाबतच्या सर्व अटी व शर्ती
शासन नियमाप्रमाणे धारण करीत आहे.
तरी आपण मान्यवरांना पुनश्च विनंती करितो की, माझा सेवांतर्गत आश्वासित योजनेचा पहिला लाभ मिळणे बाबतचे आदेश मान्यवर मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी निर्गमित करावे अन्यथा मी आज दि. १५ जूलै २०२४ पासून मा.आयुक्त (शिक्षण), पुणे कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.
या निवैदना प्रमाणे श्री. इमाम नजीर मिर्झा यांनी आज पासून बेमुदत धरणे आंदोलनास सूरूवात केली आहे.