IAS पूजा खेडकर यांच्याकडे असलेली MBBS डिग्री धोक्यात; वैद्यकीय महाविद्यालयाची केली फसवणूक ?

n62125664617205047540759b718dab73bb0b97e008828c932505db050c25cf990789703d28a7e80a3aca76.jpg

IAS पूजा खेडकर यांच्याकडे असलेली MBBS डिग्री धोक्यात; वैद्यकीय महाविद्यालयाची केली फसवणूक ?


वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एक ऑडी प्रकरण समोर आल्यानंतर आता त्यानंतर पूजा खेडकर यांची रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत.

17 कोटींची संपत्ती असतानाही यूपीएससी परीक्षेत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर केले होते. त्याचबरोबर जे दिव्यांग प्रमाणपत्र त्यांनी खोटे असल्याचे माहिती समोर येत आहे. या दोन्ही प्रमाणपत्रांच्या जोरावर त्यांना आयएएस हे पद मिळाले आहे. मात्र आता याच प्रमाणपत्रांमुळे या पूजा खेडकर यांचे आयएएस पद धोक्यात आले आहे. मात्र आता पूजा यांचे आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे.

आयएएस होण्याआधी पूजा खेडकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी २००७ मध्ये पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलमधून एमबीबीएस पूर्ण केले आहे. मात्र तेव्हाही महाविद्यालयात प्रवेश घेताना त्यांनी हेच नॉन क्रिमीलेअर ओबीसी प्रमाणपत्र सादर करून आरक्षणाचा फायदा घेत प्रवेश मिळवला असल्याचे माहिती कॉलेजच्या संचालकांनी दिली आहे. खेडकर यांना 200 पैकी 146 मार्क मिळाले होते. तरीदेखील त्यांना ओबीसी प्रमाणपत्रामुळे प्रवेश मिळाला. खेडकर यांच्या खोट्या प्रमाणपत्रांची चर्चा सुरू झाल्यानंतर आता हे आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहेत. महाविद्यालयाची फसवणूक करून त्यांनी डॉक्टरची डिग्री घेतली असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे आता यासंदर्भात देखील खेडकर यांची चौकशी होऊ शकते.

Spread the love

You may have missed