Dmart Offers : डीमार्टमध्ये खरेदीला गेल्यावर अजिबात करू नका ‘या’ 3 चुका, नाहीतर तुमचं नुकसान होणारच..!

IMG_20250928_003420.jpg

पुणे: नुकतेच पुण्यातील एका डीमार्ट स्टोअरमध्ये घडलेली घटना सर्वांसाठी धडा आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाने ४००० रुपयांच्या खरेदीत १२०० रुपये वाया घालवले, कारण त्यांनी केलेल्या तीन चुकीमुळे बिल अनावश्यकपणे फुगले आणि सामानही कमी पडले.

हे टाळण्यासाठी आज आम्ही सांगत आहोत त्या तीन चुकाबद्दल. या चुका केल्या तर तुमचे पैसे तर जातीलच, पण वेळ आणि विश्वासही गमावाल..

१ : शॉपिंग लिस्ट न बनवता जाणे

डीमार्टमध्ये पाऊल ठेवले की, डिस्काउंट बोर्ड आणि आकर्षक पॅकिंग तुम्हाला मोहित करतात. लिस्टशिवाय गेलात तर अनावश्यक वस्तूंची खरेदी होते आणि बजेट ओलांडले जाते. मुंबईतील एका गृहिणीचे उदाहरण घ्या ती फक्त दूध आणि ब्रेड घ्यायला गेली, पण ऑफर्स पाहून चिप्स, बिस्किटे आणि कॉस्मेटिक्स घेतले. घरी आल्यावर लक्षात आले की, अर्धे सामान कधीच वापरात येणार नाही. परिणाम? ८०० रुपयांचा फटका.. उपाय म्हणजे घरातूनच आठवड्याची लिस्ट तयार करा. याने जास्तीत जास्त बचत होईल.

२ : बिल केल्यानंतर वस्तू चेक न करून घेणे

बिलिंग झाल्यावर बहुतेक लोक सामान घेऊन निघून जातात, पण यात मोठी चूक आहे. चुकीचे स्कॅनिंग किंवा कमी वस्तू पॅक होऊ शकतात. कधीकधी आपण १० वस्तू खरेदी केलेल्या असतात, पण बॅगेत ८च असतात. घरी आल्यावर लक्षात येत पण स्टोअर दूर असल्याने आपण परत तिकडे जात नाही. अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे बिलिंग काऊंटरवरच बॅग उघडून प्रत्येक वस्तू आणि बिल क्रॉसचेक करा. डीमार्टचे स्टाफही मदत करतात. हे केले तर फसवणूक टळेल.

३ : गर्दीच्या वेळी जाणे आणि किंमती तपास न करणे

वीकेंड किंवा संध्याकाळी डीमार्टमध्ये गर्दी असते, जिथे घाईघाईत निर्णय चुकतात. गर्दीत ट्रॉली हाताळणे कठीण आणि किंमती तपासण्याची संधी मिळत नाही. एका व्यावसायिकाचे उदाहरण घ्या..तो शनिवारी दुपारी गेला, गर्दीमुळे तेलाचा पॅक घेतला पण दुसऱ्या शेल्फवर तोच ५० रुपये स्वस्त होता. किंमत न तपासल्याने ३०० रुपयांचे नुकसान झाले. गर्दीमुळे चुकीच्या वस्तूही घेतल्या जातात. त्यामुळे सोमवार ते गुरुवार सकाळी जा, जेव्हा स्टोअर शांत असते. प्रत्येक आयटमची किंमत दोनदा तपासा आणि बारकोड स्कॅनर अॅप वापरा.

Spread the love