अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त जनस्वराज्य फाऊंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पुणे: जनस्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने येरवडा भागातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. रविवार, ११ ऑगस्ट २०२४ रोजी, दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही जनस्वराज्य फाऊंडेशनने जागतिक स्तरावरील महान साहित्यिक आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. या कार्यक्रमाचे आयोजन फाऊंडेशनचे अध्यक्ष अश्वजीत कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमात येरवड्यातील अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यात आले.
या कार्यक्रमाला अजयभैय्या साळवे, नीता ताई गलांडे, माऊलीशेठ भुरे, विशाल मलके, अक्षय साळवे, सुनील काळोखे, सचिन कांबळे, ॲड. रोहित आगळे, सुदर्शन चखाले, ॲड. राहुल साळवी, यश नेटके, रोहित जेटके, अजय जानराव, अमर मंडलिक, सचिन रनपिसे, किरण डाके, शुभम शेलार, आकाश सोनवणे, अभी जंगम, सार्थक भारती, समर्थ धनशेट्टी, विशाल खंदारे, आदेश काकडे, ऋषिकेश गायकवाड, लौकिक शहा, सौरभ गाडे, आदित्य काळोखे, राज कांबळे, मयुर जगधने, लखन खंकाळ, निलेश काळे, बॉबी राठोड, रोहित मांढरे, शुभम साळवे, शंकर अडागळे, आशुतोष सैनिक, शुभम बने, अभि गिरी, सुरज काकडे, सुमित कांबळे, साहिल शिंदे, सौरव गवळी, ऋतिक गायकवाड, अनिकेत शिंदे, शाहीद खान, केशव साठे, अदि रनसिंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.