नवीन रेशनकार्डांवर ‘डिस्काऊंट’चा धंदा!
भोसरी परिमंडळ अधिकाऱ्याचा लाचखोरीचा कारनामा उघड

0
IMG_20251212_222809.jpg

पुणे : शासनाच्या कागदोपत्री योजना गरीबांसाठी, पण जमिनीवर मात्र ‘डिस्काऊंट लाच’ हेच नवे धोरण सुरू आहे, असे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. नवीन रेशनकार्ड मिळवण्यासाठी अपंग सामाजिक कार्यकर्त्याकडून प्रत्येकी दीड हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भोसरी ‘एफ’ झोनमधील परिमंडळ अधिकारी गजानन अशोकराव देशमुख याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

अपंग तक्रारदार, ज्यांनी इतरांना मदत करण्याच्या हेतूने १४ रेशनकार्डांचे प्रस्ताव तयार केले होते, त्यांची सरकारी फी ऑनलाईन भरल्यानंतर ‘एन’ नंबरही मिळाले. पुढचे काम म्हणजे कार्ड जारी करणे – पण इथेच अधिकार्‍यांच्या ‘लाच हाकेचा आवाज’ सुरू झाला. सुरूवातीला प्रति कार्ड ९०० रुपये, मग ती रक्कम वाढतच जाऊन १,५०० रुपये इतकी पोहोचली. गरीबांसाठी असलेली महत्त्वाची सेवा अधिकारीसाठी मात्र ‘कमाईचे साधन’ बनलेली पाहून तक्रारदारांनी ACBची धाव घेतली.

सर्वात गंमतीशीर – किंवा म्हणावं तर लाजिरवाणं – म्हणजे या अधिकाऱ्याने लाचेतदेखील ‘डिस्काऊंट’ची ऑफर दिली होती. “चार जण गरीब आहेत? ठीक आहे! त्यांच्याकडून कमी घेऊ!” अशी मनाला पिळवटून टाकणारी दांभिक उदारता दाखवत एकूण १९ हजार रुपयांची मागणी ठरली. तडजोडीत १६ हजार स्वीकारण्यावर त्यांची तयारी झाली. पण असा ‘डिस्काऊंट सेल’ ACBनेच बंद पाडला आणि नोटांच्या डल्ल्यासह देशमुख यांना जेरबंद केले.

आता प्रश्न असा—
आपल्या जनतेच्या हक्कांवरच ‘सेल’ लावणाऱ्या अधिकार्‍यांचे काय?
जनतेला पोसण्यासाठी असलेल्या अन्नधान्याच्या यंत्रणेतच भ्रष्टाचाराची भूक एवढी वाढली की अपंग सामाजिक कार्यकर्त्यालादेखील सोडले नाही!

तपास अधिकारी आसावरी शेडगे पुढील तपास करीत आहेत.

सरकारच्या घराघरांत पोचायला पाहिजे असलेल्या रेशनकार्डांची कहाणी आज ‘लाचखोरीच्या डिस्काऊंट ऑफर’पुरती मर्यादित झाली, हीच खरी काळजीची बाब आहे.

आणखीन परिमंडळ कार्यालयातील भ्रष्टाचारा, अवैध वसुलीचा लवकरच महाराष्ट्र माझा न्युज करणार परदा पर्दाफाश.

Spread the love

Leave a Reply

You may have missed