दुधनी नगरपरिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्याची मागणी – सैदप्पा झळकी

अक्कलकोट, दि. ९ (प्रतिनिधी): दुधनी नगरपरिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी केली आहे. दुधनी मुख्याधिकारी पदाच्या रिक्ततेमुळे दुधनी शहरातील विकासकामे आणि नागरी सुविधा अडचणीत आल्या असून याचा फटका नागरिकांना बसत आहे.
सध्या अक्कलकोट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे दुधनी नगरपरिषदेचा अतिरिक्त पदभार आहे. मात्र, दुधनीसह अक्कलकोट शहरही वेगाने वाढत असल्याने दोन्ही ठिकाणच्या स्वच्छता, पिण्याचे पाणी व अन्य नागरी सुविधांची जबाबदारी सांभाळणे कठीण होत आहे.
सैदप्पा झळकी यांनी सोलापूर प्रशासकीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्चाकडे दुधनी नगर परिषदेसाठी स्वतंत्र मुख्याधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी सी बोलताना श्री झळकी म्हणाले, की,”जर लवकरात लवकर मुख्याधिकारी नेमले गेले नाहीत, तर नगरपरिषद कार्यालया समोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.”
यावेळी रिपाइंचे दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ धोडमनी आणि मुस्लिम आघाडीचे शहराध्यक्ष महेदिमिया जिडगे उपस्थित होते.
दुधनी शहराची १५,००० लोकसंख्या असून, नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. स्वतंत्र मुख्याधिकारी नियुक्त झाल्यास विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा श्री सैदप्पा झळकी यांनी व्यक्त होत आहे.