सर्व ‘व्हीव्हीपॅट’ मधील चिठ्ठयांची मोजणी करण्याचा निर्णय जगतापांनी भरले १२ लाख रुपये – व्हिडिओ

IMG_20241201_122550.jpg

पुणे: महाराष्ट्र राज्य विधानसभेचे निकाल लागल्यानंतर केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात EVM बद्दल संशय व्यक्त केला जात आहे. देश विदेशातील जाणकार याबाबत आपले मत मांडत असून EVM मध्ये गैरप्रकार झाल्याची अनेकांची भावना आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याबाबत काही पुरावे ही सादर केले. हडपसर मतदार संघात पुन्हा मतमोजणी व्हावी यासाठी त्यांनी अर्ज केला असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे १२ लाख ७४ हजार रुपये शुल्कही त्यांनी चलनाच्या माध्यमातून जमा केले आहे.

पहा व्हिडिओ

Link source: rashtrasanchar

“कोण आमदार होणार, कोणाची सत्ता येणार एवढ्या पुरताच हा प्रश्न मर्यादित नाही. जनतेच्या मतांची झालेली चोरी थांबवणे, लोकशाहीचे सुरू असलेले वस्त्रहरण रोखणे, या प्रकरणात दोषी असलेल्या देशद्रोही लोकांवर कडक कारवाई करणे हेच आपले मुख्य ध्येय असल्याची भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

Spread the love

You may have missed