पुणे शहर: शाळांमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य; नियम न पाळल्यास मान्यता रद्द होणार

images-2-8.jpeg

पुणे – राज्यातील सर्व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना शाळा आणि त्यांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमानुसार कार्यवाही न करणाऱ्या शाळांविरुद्ध शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारखी कारवाई शालेय शिक्षण विभागाकडून केली जाईल.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पूर्वीचा आदेश रद्द करून नव्या नियमावलीसह आदेश जारी केला आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनीही प्राथमिकतेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून शाळांसाठी पायाभूत सुविधा, विशेषतः सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी किमान ५% निधी राखीव ठेवण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय, विविध निधींचा वापर करून सीसीटीव्ही बसविण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद अधिकारी पूर्ण करतील.

शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याव्यतिरिक्त, त्याचे फुटेज नियमित तपासणे आणि आवश्यक असल्यास स्थानिक पोलीस प्रशासनासह कार्यवाही करणे ही मुख्याध्यापकांची जबाबदारी असेल. तक्रार पेटी बसविणे आणि त्यासंदर्भातील नियमानुसार कार्यवाही करणे बंधनकारक आहे, अन्यथा मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई होईल.

Spread the love

You may have missed