फडणवीसांच्या गृह विभागाकडून मोठी हालचाल: पुणे ग्रामीणमधील 15 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
Police.jpg

पुणे – उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाकडून पुणे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. प्रशासकीय निकड आणि जनहित लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी एकाचवेळी 15 वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काही अधिकाऱ्यांची कामगिरी सुमार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनाही बदलीचा फटका बसल्याची चर्चा आहे. सर्व अधिकाऱ्यांना त्वरित नवीन पदस्थानी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बदलींचा तपशील पुढीलप्रमाणे :

पोलिस निरीक्षक कुमार रामचंद्र कदम – वडगाव मावळ वरून सासवड पोलीस ठाणे

पोलिस निरीक्षक सचिन दत्तात्रय वांगडे – हवेली वरून उरळीकांचन

पोलिस निरीक्षक रविंद्र दत्तात्रय पाटील – कामशेत वरून नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण

सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव चंद्रकांत शेलार – नारायणगाव वरून स्थानिक गुन्हे शाखा


तर मुदतपूर्व बदल्यांतर्गत काही अधिकाऱ्यांची बदली पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे :

पोलिस निरीक्षक अभिजीत सुभाष देशमुख – परकीय नागरिक नोंदणी कक्ष ते वडगाव मावळ

पोलिस निरीक्षक वैशाली रावसाहेब पाटील – बारामती तालुका ते हवेली

पोलिस निरीक्षक शंकर मनोहर पाटील – उरळीकांचन ते कामशेत

पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव – बारामती वाहतूक शाखा ते बारामती तालुका

पोलिस निरीक्षक श्रीशैल रामचंद्र चिवडशेट्टी – नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण ते बारामती वाहतूक शाखा

पोलिस निरीक्षक ऋषिकेश भाऊसाहेब अधिकारी – सासवड ते नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण

सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन हनुमंत खामगळ – वेल्हा ते नियंत्रण कक्ष, पुणे ग्रामीण

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण महादेव सपांगे – यवत ते नारायणगाव

सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर विठ्ठल शेवते – अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालय, पुणे ते वेल्हा

सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन रतन चेके – उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती कार्यालयातून नीरा–नृसिंहपूर पोलीस ठाणे (ठाणे कार्यान्वित झाल्यानंतर)

या बदल्यांमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात नवीन ऊर्जा आणि कार्यक्षमतेचा संचार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचे नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी हा प्रशासकीय निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

You may have missed