अक्कलकोट तालुक्यातील अवैध्य धंदे बंद करण्यात यावे- सैदप्पा झळकी

0


अक्कलकोट(प्रतिनिधी)दि १२- सोलपूर जिल्ह्यातील अक्कलकोट व हैद्रा या तीर्थक्षेत्रा सह तालुक्यातील दुधनी व ईतर ठिकाणी अवैध्य धंदे अगदी राजारोसपणे चालु असून याला आळा घालण्यात यावे.अशी मागणी रिपाइं(आठवले गट)चे जिल्हा उपाध्यक्ष श्री सैदप्पा झळकी यांनी सोलापूर ग़्रामीण चे अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांच्या कडे केली आहे.
      

या विरोधात कितीही आवाज उठवले तरी आतापर्यंत पूर्णपणे बंद झालेली नाही. अक्कलकोट शहरासह दुधनी आणि दुधनी ग़्रामीण, हैद्रा व ईतर ठिकाणी सुरु असलेल्या सर्व अवैध्य धंदे बंद करण्यासाठी अनेकदा विविध स्तरातून, पक्ष,संघटने सह सामान्य नागरिक व महिला मागणी करुन देखील हे का? बंद झाली नाही? म्हणून पोलिस व लोक प्रतिनिधिवर नाराज व्यक्त होत आहे. संपूर्णपणे बंद करण्याची मागणी असतांना देखील अवैध्य धंदेवाल्यांनी ते बंद न करता संबंधित पोलिस अधिकारी व अवैध्य धंदे वाल्यांच्या संगनमताने फक्त जागा बदलून लोकांना दिशाभूल करत आहे. अवैध्य धंदे का बंद होत नाही ? म्हणून नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. यामुळे
        

तालुक्यात सद्या सर्वत्र मध्यपान, मटगा,जुगार(रम्मी व तिनपत्ते)खेळ, चोरीया सह कर्नाटकातील अक्रम मद्यविक्री सह इतर अवैध्य धंदे राज रोषपणे सुरु केली आहे. यामुळे पोलिस प्रशासनाच्या प्रतिमा मलीन झाली आहे. या अवैध्य धंदे असलेल्या परिसरातील नागरिकांना पोलिसा बद्दल विश्वासच राहिलेली नाही. कारण हे धंदे करणारी लोक समाजात वावरत म्हणतात की, अशा कितिही अर्ज करा धंद्यावर पोलिसांचे छाप पडत नाही साधा ताकीतही पोलिस देऊ शकत नाही आम्ही वरपखसून सगळ्यांचा कानावर ठेवली आणी हप्ता देतो त्यामुळे आमच्या काहीही फरक पडत नाही, असे बिनधास्तपणे बोलतात. आणी पोलिसही खुन्नस धरुन विरोध करणार्यांवर खोटे गुन्हा दाखल करतील असे भीती लोकांनी व्यक्त करत आहे. अवैध्य धंदे  करणारेही लोकांना धमकावत यामुळे कोणालाही पोलिसांवर विश्वास उरलेला नाही.
     

अक्कलकोट दुधनी व दुधनी ग़्रामीण  जवळील परिसरात राज रोषपणे अवैध्य धंदे सुरु असल्याने या भागातील लहान मुले व विध्यार्थी आहारी जाऊन बिघडवत आहे. मटका व जुगारात कर्जबाजारी झाल्यावर दारुच्या आहारी होवून कितीतरी संसार उध्वस्त होवून रस्त्यावर आली आहे. अनेक महिला विधवा झाली. काहिंच्या पत्नी सोडून गेली आहे. यामुळे समाजातील सुसंस्कारीत महिला वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे. तरी आपण वरीष्ठ जातीने लक्ष घालून लवकरात लवकर बंद करण्यात यावे. अशी मागणी श्री सैदप्पा झळकी यांनी केली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed