पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पुन्हा अपघात; कारने दिलेल्या धडकेत शाळकरी मुलाचा मृत्यू

n6214007071720588116958baf98ff206d275a5341dd929958fe725e5b98a03032a5addc7f81dac4e4cda47.jpg

पुणे : काल सकाळच्या सुमारास साडेआठ वाजता येरवड्यातील कल्याणीनगर भागातील मेरी गोल्ड सोसायटीसमोर कार आणि सायकलची धडक होऊन शाळेत सायकलने जाणारा मुलगा शाश्वत राम बोगाडे (वय 15 वर्षे, राहणार – कुमार कृती सोसायटी, कल्याणीनगर) गंभीर जखमी झाला. त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

हुंडाई मोटर कार चालक रविकांत रामदिन गौर (वय 37 वर्षे, राहणार – रोहन निगम अपार्टमेंट, विमाननगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली. वैद्यकीय तपासणीत मद्यप्राशन केले नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Spread the love

You may have missed