Pune Dam Storage Update: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराजवळील धरणे भरली, हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा अंदाज, नागरिकांना नदीपात्र न उतरण्याचा सल्ला

0

Pune Dam Storage Update: पुणे शहराजवळील खडकवासला धरण ९०.३९%, पानशेत १००%, वरसगाव १००% आणि टेमघर १००% एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना धरण १००% क्षमतेने भरलेले आहे.

त्यामुळे पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी सतर्क व दक्ष राहणे आवश्यक आहे. आज २४/०९/२०२४ ते २९/०९/२०२४ या कालावधीत हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे मुठा व पवना नदीपात्रात येव्या नुसार व मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे, तसेच त्यानंतर पर्जन्यमानानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्यात येईल. उपरोक्त विषयानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सखल भागातील संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात न उतरण्याचा सल्ला दिला आहे. पुणेकरांना सतर्कतेचा इशारा-

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed