पुण्यातील पूरस्थितीबाबत मोठी अपडेट; खडकवासला धरनातून पाण्याचा विसर्ग सुरूच – व्हिडिओ
व्हिडिओ पाहण्याकरिता खालील फोटोवर क्लिक करून पुन्हा 30 सेकंद नंतर एकदा क्लिक करा.
पुण्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खडकवासला धरनातून अजूनही 45 हजार क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे.
मात्र आता पुणेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे मुठा नदीकाठची पूरस्थिती नियंत्रणात असून, एकतानगरची पाणी पातळी आता बऱ्यापैकी उतरली आहे. फक्त दोन तीन सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी आहे. दुसरीकडे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर येणार असून, ते पूर परिस्थितीतीची पाहाणी करणार आहेत.
खडकवासला धरणात सध्या 74 टक्के इतका पाणीसाठा आहे, तो 65 टक्क्यांपर्यंत येईपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे, संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेऊन धरणातून विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा शेवटच्या क्षणी रद्द झाला आहे. या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते, पण राज्यातील पाऊस आणि काही भागातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा तूर्तास लांबणीवर पडला आहे.
राज्यातील आपत्कालीन व्यवस्था आणि मदतकार्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व प्रशासकीय संबंधित अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहेत. आज पूर परिस्थिती पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज्यातील पूरस्थिती नियंत्रणात आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीचा दौरा करणार आहेत.