Ladki Bahin Yojana । लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताय? जरा थांबा, ‘हे’ महत्त्वाचे मुद्दे वाचूनच करा अर्ज; नाहीतर..

0

Ladki Bahin Yojana । राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. यासाठी लाखो अर्ज येऊ लागले आहेत. सर्वत्र या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. पुढच्या महिन्यात या योजनेचे पैसे खात्यात जमा करण्यात येतील.

दरम्यान, ही योजना जाहीर झाल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत, अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये अनेक बदल केले आहेत. विशेष म्हणजे याच कागदपत्रांमध्ये हमीपत्र एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. जर लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करताना तुम्ही हे हमीपत्र जमा केले नाही तर तुमचा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे हमीपत्र नेमके काय आहे? हे जाणून घेणे गरजेचे आहे.

हे आहेत महत्त्वाचे मुद्दे
माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/ संचालक/ सदस्य नाहीत.
माझ्या कुटुंबातील सदस्य प्राप्तिकरदाता नाही.
मी स्वत: किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीनंतर घेत नाही.
तसेच मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही.
माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही.
माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार, खासदार नाही.
माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही.
माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत नाहीत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed