पुणे: कोंढव्यात अवैध दारू कारवाईदरम्यान पोलिसांना सापडली मोठी रोकड; परिसरात खळबळ – व्हिडिओ
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील कोंढवा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अवैध दारूविक्रीवर कारवाई करण्यासाठी पोलिस पथक संबंधित ठिकाणी गेले असता, तेथे बंद कपाटात मोठी कॅश सापडल्याचे उघडकीस आले.
पहा व्हिडिओ
ही रोकड नेमकी किती आहे, ती कुणाची आहे आणि कोणत्या व्यवहारातून जमा झाली, याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी सदर रोकड ताब्यात घेतली असून, तिचा स्रोत शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. अवैध दारूविक्रीशी या रकमेचा थेट संबंध आहे का, की यामागे आणखी काही काळं-धंदे दडले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे कोंढवा परिसरात चर्चेला उधाण आले असून, “दारूच्या कारवाईत कॅशचा कपाटभर साठा कसा?” असा सवाल नागरिक विचारत आहेत. दरम्यान, संबंधित व्यक्ती किंवा मालकाचा शोध घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज, कागदपत्रे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आहेत.
कोंढव्यातील ही घटना अवैध व्यवसायांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, याचीच साक्ष देत असून, या प्रकरणातून आणखी कोणकोणते धागेदोरे बाहेर येतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.