राज्यातील अल्पवयीन मुले, विद्यार्थी एनर्जी ड्रिंक्सच्या विळख्यात ; आमदार सत्यजीत तांबेनी सभागृहात मांडल भयानक वास्तव

0

अन्न व औषध प्रशासनाच्या आकडेवारीवर बोट ठेवत धारेवर धरल

-सभापती नीलम गोऱ्हेंनी १५ दिवसात बैठक घेण्याचे दिले आदेश

पुणे : राज्यातील तरुणांचे प्रश्न सभागृहात कायम मांडणारे आमदार सत्यजीत तांबे यांनी आज सभागृहात लहान मुले आणि विद्यार्थ्यां यांच्या संदर्भातील महत्त्वाच्या विषय हाती घेऊन संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले.

राज्यसरकारने ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहीम हाती घेतली असताना किरणा माल आणि शाळा कॉलेजच्या आसपास असलेल्या दुकानात कमी किंमतीत उपलब्ध होणारे एनर्जी ड्रिक हे एखाद्या ड्रग्ज येवढेच घातक असल्याचे आमदार तांबे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर सभापती नीलम गोऱ्हे यांनी चिंता व्यक्त करत येत्या १५ दिवसांत बैठक घेण्याचे आदेश संबंधित मंत्री आणि प्रशासनाला दिले.

जाहिरातींचे अनुकरण करून तरुण वर्गात दिवसेंदिवस एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली कॅफेनयुक्त थंड पेय सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पेयामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. शाळा परिसरात एनर्जी ड्रिंकची सहज विक्री असल्याने शाळेतील मुलांना सहज उपलब्ध होत आहे. राज्यामध्ये शाळा परिसरातील कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी आणा, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली. आमदार सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या मुद्यावर मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शाळा परिसरात ५०० मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे जाहीर केले.

राज्यातील नाशिक मुंबईसह सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) तसेच नशेच्या गोळ्या बाजारात विक्रीसाठी सहज उपलब्ध आहेत. तरुण वर्गासोबतच लहान मुले देखील याकडे आकर्षित होत आहेत. शाळा व महाविद्यालय परिसरात कॅफेनयुक्त पेय (एनर्जी ड्रिंक्स) सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात कॅफेनयुक्त पेयांचा (एनर्जी ड्रिंक्स) प्रसार केला जातो. एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवर देखील सरकारने बंदी घालावी तसेच शाळा परिसरात कॅफेनयुक्त थंड पेयांच्या विक्रीवर बंदी घालून योग्य कार्यवाही करावी. याबाबत संबधित अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेण्यात यावी अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी सभागृहात केली.

आ. सत्यजीत तांबेंनी मांडलेल्या प्रश्नांवर अन्न व औषध प्रशासनाने या संदर्भात १५ दिवसाच्या आत बैठक घ्यावी. त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवर देखील काही आक्षेपार्ह असल्यास अधिकाऱ्यांना सांगून कायदेशीर कारवाई करावी, असे सभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. शाळा परिसरात ५०० मीटर अंतरावर कॅफेनयुक्त पेयांवर (एनर्जी ड्रिंक्स) तातडीने बंदी घालण्यात येईल. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी करून योग्य कार्यवाही करण्यात येईल. एनर्जी ड्रिंक्सच्या जाहिरातींवर देखील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

एनर्जी ड्रिंक्समुळे होणारे दुष्परिणाम कोणते?

-एनर्जी ड्रिंक्समध्ये वापरण्यात येणारे कॅफेन शरीराला अत्यंत घातक

-कॅफेनचे जास्त सेवन केल्यामुळे नशा येऊन मेंदू, किडनी, मज्जारज्जू यावर विपरीत परिणाम होतो.

-अस्वस्थता, निद्रानाश, प्रजनन समस्या, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि चिडचिडेपणा या व्याधींचा धोका निर्माण होतो.

वय वर्ष १८ खालील मुलांसाठी विक्री नाही
स्टिंग आणि आणि इतर काही एनर्जी ड्रिंक्सची किरण मालाच्या दुकानात मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. वस्तूता हे एनर्जी ड्रिंक्स १८ वर्षाखालील मुलांनी सेवन करू नये असे लिहिण्यात आलेले असते मात्र विक्रेते याकडे साफ दुर्लक्ष करून सरसकट वयातील मुलांना याची विक्री करतात. अनेक पालकांमध्ये देखील याबाबत जागरूकता नसल्याने आढळून आल्याने विक्रीचे प्रमाण अधिक आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed