पुणे: चंदननगरमध्ये प्रतिबंधित गुटख्याचा साठा उघड; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे दि. २८ ऑक्टोबर — पुण्यातील चंदननगर परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून विक्री करणाऱ्या दो,घांविरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मुनवारा सोसायटीच्या आवारात करण्यात आली.
गणेश चंद्रकांत पाटील (वय ३१) आणि रामलाल गायकवाड देवासी (वय ३२, दोघेही वडगावशेरी) अशी आरोपींची नावे असून, त्यांच्या विरोधात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम २६(२)(i)(iv) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून, पोलीस अंमलदार विकास संपत कदम यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी आरोग्य विभागाने बंदी घातलेले तंबाखूजन्य पदार्थ साठवून विक्रीसाठी ठेवले होते. नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारी ही कृती असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य साठा जप्त केला आहे.
या कारवाईनंतर परिसरातील बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अशा विक्रेत्यांवर पुढील कारवाई सुरू असल्याची माहितीही मिळाली आहे.