पुणे: महाळुंगे एमआयडीसी परिसरात लाल काला व्यवसाय फोफावला; पोलिसांकडून दुर्लक्ष?

महाळुंगे (प्रतिनिधी) – माळुंगे एमआयडीसी परिसरात अवैध लाल काला (जुगार) व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर मूळचा राहणारा व्यक्ती शिवा पवार हा दररोज जागा बदलून महाळुंगे एमआयडीसी परिसरात जुगाराचा अवैध व्यवसाय चालवत आहे. या धंद्याला कोणाचे तरी आश्रय लाभत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करत आहेत.
पहा व्हिडिओ


दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की,
“महाळुंगे पोलिस स्टेशन औद्योगिक वसाहतीत कोणत्याही अवैध धंद्यांना थारा नाही, तसेच अभयही दिले जात नाही. नागरिकांनी जर अशा प्रकारच्या कारवायांची माहिती दिली, तर तातडीने कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट केले आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाने तत्काळ तपास सुरू करून या अवैध व्यवसायावर अंकुश ठेवावा, अशी मागणी केली आहे.