पुणे : पूजा खेडकर यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; ‘वाय सी एम’ रुग्णालयातूनसुद्धा मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र – वाचा सविस्तर

0

पुणे : वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर या विविध कारणांनी चर्चेत आहेत. आता पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे. वायसीएम रुग्णालयातूनही (YCM Hospital Pune) त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतले होते.

गुडघ्याच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र : पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातूनही अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलंय. डाव्या गुडघा सात टक्केवारी कायमस्वरूपी आधु असल्याचं या प्रमानपत्रात नमूद करण्यात आलं आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं. याआधी पूजा खेडकर यांना कमी दिसतं, त्याअनुषंगाने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र समोर आलं आहे.

Link source: civic mirror

यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा काय संबंध : 24 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या या प्रमाणपत्रात त्यांच्या डाव्या गुडघ्याच्या सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्वाचं उल्लेख आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रेशन कार्ड आणि इलेक्ट्रिक बिल सादर केलं होतं. याआधी त्या कमी दिसण्याच्या समस्येमुळं चर्चेत होत्या.


पिंपरी-चिंचवड कनेक्शन : पूजा खेडकर यांना 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्यातील प्रोबेशन पिरियडमध्ये एडीएम म्हणून नियुक्ती मिळाली होती. प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांनी प्रशासनाच्या कामकाजाच्या बाबतीत शिकण्याची अपेक्षा होती. परंतु त्यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी जाईन करण्यापूर्वीच अनुचित मागण्या केल्या आणि त्यानंतर देखील सतत तक्रारी केल्या. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे त्यांच्या तक्रारीची नोंद केली होती. पूजा खेडकर यांच्या विवादास्पद वर्तनामुळं आणि त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामुळं पिंपरी-चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे. ज्यामुळं त्यांच्या बाबतीत आणखी नवीन चौकशी होण्याची शक्यता आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed