पुण्यातील कोंढवामध्ये एटीएसकडून सर्च ऑपरेशन; चौकशीसाठी संशयित ताब्यात

0
IMG_20251009_130727.jpg

पुणे: बुधवारी रात्री उशिरा पुण्यातील कोंढवा परिसरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), पुणे पोलिस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी मोठी संयुक्त मोहीम सुरू केली.

या सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे पुण्यात तसेच राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

पहा व्हिडिओ

माहितीनुसार, परिसरात संशयास्पद हालचालींबद्दल गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही कोंढवा परिसरातून दहशतवादी कारवाया करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे या परिसरावर केंद्रीय यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. बुधवारी सुरू झालेल्या कारवाई दरम्यान पुणे पोलिस आणि एटीएसचे जवळपास ३५० कर्मचारी पुण्यातील कोंढवा भागात तैनात करण्यात आले आहेत. अनके ठिकाणी पोलिस आणि एटीएस अधिकाऱ्यांकडून हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले आहे. ही मोहीम संशयितांच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर येत आहे.

कारवाईदरम्यान, अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांची ओळख अद्याप उघड करण्यात आलेली नाही. पथकांनी काही परिसरातून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे आणि मोबाईल डेटा जप्त केल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या कारवाईच्या स्वरूपाबाबत कडक गुप्तता पाळली आहे. ही एक समन्वित कारवाई आहे ज्यामध्ये अनेक राज्य आणि केंद्रीय सुरक्षा एजन्सींचा समावेश आहे. प्रारंभिक चौकशी पूर्ण झाल्यानंतरच सविस्तर माहिती दिली जाईल, असे सांगण्यात येत आहे. पुणे पोलिसांनी दोन वर्षांपूर्वीच बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांना कोंढवा परिसरातून अटक केली होती. त्यानंतर देशातील संभाव्य दहशतवादी कट उधळण्यात यश आले होते. त्याच भागात आता पुन्हा कारवाई केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed