आता येरवड्यातील वाहतूक सुसाट ! येरवडा चौकातून कोंडीचा कायमचा निरोप ! उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरला मंजुरी

0
n68097600617578298799559fbf9aa6fbc3c252b731a2ca796b2a05a1299c6aa7f18988ba9564f0d6f0c8da.jpg



पुणे : येरवड्यातील बिंदू माधव ठाकरे चौकातील कायमस्वरूपी वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे येथील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शहरातील शिवाजीनगर, स्वारगेट, कोथरूड या भागातून विमानतळ, आळंदी व नगरकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या चौकाचा वापर केला जातो. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. खडकीहून येरवडा, तसेच संगमवाडीमार्गे विमानतळ, बंडगार्डन पूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे दररोज मोठी गर्दी होत होती.

संगमवाडीतील खासगी ट्रॅव्हल बस थांबाही याच मार्गावर असल्याने वाहतूक कोंडीत आणखीन भर पडत होती. अनेक वर्षांपासून नागरिक या चौकातील समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी करत होते. अखेर महापालिकेने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.

महापालिकेच्या प्रकल्प विभागाने या उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरसाठी आराखडा तयार करून प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

असा असेल उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर
बिंदू माधव ठाकरे चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी उड्डाणपूल व समतल विलगक उभारले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे येरवड्यातील वाहतूक सुरळीत होईल आणि प्रवाशांचा बराचसा वेळ वाचणार आहे.


Spread the love

Leave a Reply