येरवडा: ईद-ए-मिलाद निमित्त येरवड्यात सरबत वाटप व नागरिक सत्कार

पुणे – ईद-ए-मिलाद निमित्ताने येरवडा बाजार परिसरात मुस्लिम छप्परबंद एकता येरवडा ग्रुप तर्फे सरबत वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या उत्साहात लाभ घेतला.
पहा व्हिडिओ
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचे शाल-गुलाब देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी आम आदमी पार्टीचे पुणे शहर संघटन सहमंत्री मा. मनोज शेट्टी यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन हुसेन शेख, फारूक शेख व सलीम शेख यांनी केले होते. परिसरात सर्वत्र बंधुभाव, ऐक्य व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
—