“बेरोजगार युवक चप्पल झिजवतो, तर काहींना सुवर्ण पदं घरबसल्या! “प्रशासनातील सुवर्ण पोस्टिंग्ज : योगायोग की मिलिभगत?

0
IMG-20250820-WA0004.jpg

नवी दिल्ली : देशातील बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात चप्पल झिजवतात, तर काही ठराविक मंडळींना प्रशासनातील “सुवर्ण पोस्टिंग्ज” आयत्याच मिळत असल्याची चर्चा जोर धरत आहे. या प्रकरणामुळे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

ज्ञानेश कुमार यांचे भाजपसोबतचे संबंध केवळ राजकीय मर्यादेत नसून कौटुंबिक आणि घरोब्याचे असल्याची माहिती बाहेर आली आहे. त्यामुळे प्रशासनातील महत्त्वाच्या नियुक्त्यांवर प्रभाव व जवळिकीचे राजकारण कार्यरत असल्याची शंका व्यक्त होत आहे.

कुटुंबातील महत्त्वाच्या पदांवर कब्जा :

मोठी मुलगी – जिल्हाधिकारी, नोएडा (नोएडाची पहिली महिला DM)

जावई – जिल्हाधिकारी, सहारनपूर

दुसरी मुलगी – इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS), श्रीनगर

दुसरा जावई – जिल्हाधिकारी, श्रीनगर


सामान्यतः पती-पत्नी दोघांनाही एकाच राज्यात उच्च प्रशासकीय पद मिळण्याची शक्यता एक टक्का पेक्षाही कमी असते. पण कुमार कुटुंबात हा “दुर्मीळ योग” दोनदा घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

फक्त योगायोग म्हणावा का?

जाणकारांच्या मते, या नियुक्त्या केवळ योगायोग नसून राजकीय पाठबळ, जवळीक आणि निवडणुकीत छुपे सहकार्य यामागे कारणीभूत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते रमेश खामकर यांनी यावर गंभीर सवाल उपस्थित करत म्हटले की, “सामान्य युवक बेरोजगारीत खितपत पडलेले असताना, सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या कुटुंबांना सुवर्ण पोस्टिंग्ज सहज मिळणे म्हणजे प्रशासन पोखरणाऱ्या रॅकेटचे उदाहरण आहे.”


——-

Spread the love

Leave a Reply

You may have missed