श्री कृष्णा मित्रमंडळाचे 53 व्या वर्षात पदार्पण; वाहतूक वॉर्डनांचा सत्कार

IMG-20250812-WA0004.jpg

येरवडा – श्री कृष्णा मित्रमंडळ (मंदिर सेवा ट्रस्ट)ने आपल्या 53 व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने येरवडा वाहतूक विभागातील वॉर्डनांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष बाळा विश्वासराव यांच्या हस्ते वाहतूक व्यवस्थेत मोलाची सेवा देणाऱ्या वॉर्डनांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

सत्कारित वॉर्डनांमध्ये लक्ष्मण गवळी, विजय चहांदे, राजेश चव्हाण, महिंद्रा जैन आणि शैलेश जुंजारे यांचा समावेश होता.
या उपक्रमामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या वॉर्डनांचा उत्साह वाढला असून, उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.


Spread the love