आयुष्मान कार्डधारक रुग्णांना 5 लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा; आता ‘या’ आजारांवर खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत

पुणे | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी आयुष्मान भारत योजने अंतर्गत देशभरातील लाखो कुटुंबांना आरोग्य सेवा मिळवण्याचा मोठा दिलासा मिळत आहे. आयुष्मान कार्ड असणाऱ्या पात्र नागरिकांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळत आहेत.
या योजनेमुळे गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांचे मोठ्या आर्थिक भारापासून संरक्षण होत आहे. कार्डधारक रुग्णांना योजनेअंतर्गत विविध आजारांवर उपचार मिळत असून, त्यासाठी कोणतेही पैसे भरावे लागत नाहीत. उपचाराचा खर्च थेट सरकारकडून रुग्णालयांना अदा केला जातो.
मोफत औषधोपचार, शस्त्रक्रिया, तपासण्या आणि हॉस्पिटलायझेशन यासारख्या विविध सेवा या योजनेत समाविष्ट आहेत. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांना आता दर्जेदार वैद्यकीय सेवा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध होत आहेत.
आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, देशभरात हजारो सरकारी व खासगी रुग्णालये ही योजना लागू करत आहेत. नागरिकांना फक्त त्यांचे आयुष्मान कार्ड दाखवून नोंदणीकृत रुग्णालयांमध्ये उपचार घेता येतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व पात्रतेची पडताळणी आवश्यक असून, संबंधित अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक आरोग्य केंद्रांवर अर्ज करता येतो.
—