Pune water supply: पुण्यातील काही भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद, तुमचा परिसर देखील यादीत आहे का? वाचा…
पुणे : गुरुवार दि.(4 जुलै) रोजी नवीन पर्वती जलशुद्धीकरण,खडकवासला,जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र,पर्वती MLR टाकी केंद्र,लष्कर जलकेंद्र,वडगाव जलकेंद्र परिसर आणि भामा आसखेड जलकेंद्र परिसर येथील विद्युतविषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद(Pune) राहणार आहे.तसेच, शुक्रवारी (दि.5 जुलै)रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन पाणीपुरवठा (पुणे महानगरपालिका) विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग
पर्वती जलकेंद्रअंतर्गत(Pune) पाणीपुरवठा बंद असणारा भाग
पर्वती MLR टाकी परिसर – गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी,गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर,सोमवार पेठ,घोरपडे पेठ इत्यादी.
पर्वती HLR टाकी परिसर – सहकारनगर,बिबवेवाडी,पद्मावती,मुकुंदनगर,गंगाधाम,शिवतेजनगर,कात्रज,धनकवडी,प्रेमनगर,अप्पर इंदिरानगर,लोवर इंदिरानगर,शेळकेवस्ती, महेश सोसायटी इत्यादी
पर्वती LLR परिसर – शहरातील सर्व पेठा,दत्तवाडी,डेक्कन परिसर,शिवाजीनगर,स्वारगेट,लोकमान्य नगर इत्यादी
लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग – सातववाडी,संपूर्ण हडपसर,ससाणेनगर,कोंढवा,एनआयबीएम रोड,साडेसतरा नळी,उरुळी देवाची, कोरेगाव पार्क,महमदवाडी,रामटेकडी,वडगाव शेरी,लुल्लानगर,मालधक्का रोड,संपूर्ण ताडीवाला रोड,खराडी,विमाननगर,फुरसुंगी,मांजरी,येरवडा,रेसकोर्स इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर
एस.एन.डी.टी. आणि चतुश्रुंगी परिसर- गोखलेनगर, औंध,बोपोडी,पुणे विद्यापीठ,सेनापती बापट रोड,बीएमसीसी रोड,भांडारकर रोड,भीमनगर,प्रभात रोड,वेदांतनगरी, आयसीएस कॉलनी,भोसलेनगर,कर्वेरोड,हिमाली सोसायटी,मयुर कॉलनी,वारजे,राहुलनगर
वडगाव जलकेंद्र परिसर- हिंगणे, आनंदनगर,वडगाव, धायरी,धनकवडी,आंबेगाव,येवलेवाडी,दत्तनगर,भारती विद्यापीठ परिसर
भामा आसखेड परिसर-लोहगाव,विमाननगर,कल्याणीनगर,फुलेनगर,येरवडा इत्यादी.
तुम्हाला अचूक आणि विश्वासार्ह बातम्या देण्याचा आमचा उद्देश आहे, जेणेकरून तुम्ही जगात काय चालले आहे ते जाणून घेऊ शकता.