वाहनचालकांनो खबरदार! नियम तोडल्यास 6 महिन्यांची गाडी जप्ती; पुण्यात 200 वाहनं जप्त

1

पुणे: शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने कडक पावले उचलली आहेत. गेल्या १५ दिवसांत तब्बल २२ हजार ७२७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, २१५ वाहने ६ महिन्यांसाठी जप्त करण्यात आली आहेत.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, राँग साईड ड्रायव्हिंग तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. यापुढील काळात आणखी तीव्र कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरातील मेट्रो आणि इतर विकासकामांमुळे वाहतूक कोंडी प्रचंड वाढली आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. नुकत्याच कल्याणीनगर येथील एका अपघातात अल्पवयीन वाहनचालक समोर आल्यानंतर पोलिसांनी ही विशेष मोहिम हाती घेतली. कारवाईनंतरही काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे, त्यामुळे वाहन जप्त करण्याची कठोर भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे.

१५ दिवसात झालेली प्रमुख कारवाई:

राँग साईड ड्रायव्हिंग: २१,२८५ वाहनचालकांवर कारवाई

ट्रिपल सीट वाहन चालवणे: २,८७२ जणांवर कारवाई

ड्रंक अँड ड्राईव्ह: ५७० जणांवर कारवाई

जप्त वाहने: २१५ वाहने ६ महिन्यांसाठी जप्त


वाहतूक नियंत्रणासाठी ८५० पोलीस कर्मचारी दोन सत्रांमध्ये काम करत असून, शहरातील विविध चौकांमध्ये वाहतूक नियमन करण्यात येत आहे. याशिवाय, दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीवर काही भागात बंदी असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Spread the love

1 thought on “वाहनचालकांनो खबरदार! नियम तोडल्यास 6 महिन्यांची गाडी जप्ती; पुण्यात 200 वाहनं जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed