भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही… ACB येणार आपल्या दारी
पुणे: लोकसेवकांच्या भ्रष्टाचारविषयक तक्रारी नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करता याव्यात याकरीता तालुक्यांच्या शासकीय विश्रामगृहस्थळी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सहायक आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे.
भोर येथे मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी, लोणावळा ९ ऑक्टोबर, बारामती १० ऑक्टोबर, खेड राजगुरुनगर ११ ऑक्टोबर, नारायणगांव १२ ऑक्टोबर, दौंड १३ ऑक्टोबर, सासवड १४ ऑक्टोबर, शिरुर १९ ऑक्टोबर, इंदापूर २० ऑक्टोबर आणि जुन्नर येथे २७ ऑक्टोबर २०२४ रोजी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून नागरिक त्यांच्याकडील माहिती, तक्रारी सादर करू शकतात, असे लाचलुचपत विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी कळविले आहे.