आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वारगेट मेट्रोचे उदघाटन, वाहतूक बदल

0

पुणे: बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गुरुवारी रेड अलर्ट जारी झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र आता स्वारगेट मेट्रोच्या उद्घाटनाला नवीन मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट भूमिगत मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन येत्या रविवारी (29) संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.

कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने काही मार्गांवर बदल लागू केले आहेत. नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

वाहतूक बदल:

1. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक ते सारसबाग परिसरात जमनालाल बजाज पुतळ्याजवळ वाहन लावण्यास मनाई.


2. जेधे चौक ते जमनालाल बजाज पुतळा दरम्यान आवश्यकतेनुसार दुहेरी वाहतूक सुरु राहील.


3. वाहनचालकांनी व्होल्गा चौक, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह, मित्रमंडळ चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक मार्गाचा वापर करावा.


4. सातारा रस्ता उड्डाणपुलावरून सोलापूर रस्त्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहील.


5. शिवाजीनगर न्यायालय आणि छत्रपती शिवाजी पुतळा चौक ते तोफखाना चौक रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास बंदी.



सर्व नागरिकांनी नियोजित मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed