पुणे: टिंगरेनगर येथे मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेणारा चोरटा जेरबंद
पुणे: विश्रांतवाडी परिसरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटा पळून गेला होता. ही घटना दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता टिंगरेनगर येथे घडली. सोनाली संदीप जाधव या महिलेचे ७ ते ८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने हिसकावून नेले होते. या घटनेची नोंद विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
हा व्हिडिओ
तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून आरोपीचा शोध घेतला. पोलीस हवालदार अमजद शेख, संजय बादरे, संपत भोसले, व किशोर भुसारे या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना खास खबर मिळाली की, आरोपीने वापरलेली मोपेड (नंबर एम.एच.१४ जे.डब्ल्यू.४९७२) आळंदी परिसरात आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आळंदी परिसरात मोपेडसह आरोपीला अटक केली.
आरोपीने आपले नाव कृष्णा उर्फ किशोर अशोक पवार (वय २६ वर्षे, रा. वडगाव घेणंद, आळंदी) असे सांगितले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील चौकशीत त्याने चोरलेले मंगळसूत्र आपल्या मित्र ओंकार रमेश चव्हाण (रा. आळंदी) याच्याकडे विक्रीसाठी दिल्याचे उघड झाले. पोलिसांनी ओंकार चव्हाण यालाही अटक करून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त केले.
सदरची कामगिरी मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. हिंमत जाधव, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्रीमती अनुजा देशमाने, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, मा. श्रीमती कांचन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, श्री शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री नितीन राठोड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली आहे.