पुणे: इमारतीच्या डक्ट मध्ये पडुन गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा मृत्यू

0

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : प्रतिनिधी, दीपक बलाडे, रावेत पोलिस ठाणे हद्दीतील एका बहुमजली ईमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून डक्ट मध्ये पडुन येथील मजुर कामगाराची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि. 28 आॅगस्ट रोजी
मुकाई चौक रावेत येथील एका अॅस्टोरीया राॅयल्स नावाच्या मोठ्या बांधकाम गृह प्रकल्पावर
सायंकाळच्या सुमारास घडली होती. त्या चिमुकलीचा धायरीतील नवले रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


खुशबु निशाद (वय, वर्षे 5, रा. रावेत, मुळ गाव छत्तीसगड) असे त्या गंभीर जखमी झालेल्या साईट वरील मजुराच्या चिमुकल्या मुलीचे नाव आहे.  याबाबत अधिक माहिती अशी की, रावेत येथील मुकाई चौक परीसरात मुख्य रस्त्यालगत अॅस्टोरीया राॅयल्स नावाचा एक मोठा बांधकाम प्रकल्प सुरू आहे. त्या ठिकाणी तिन मजली पार्कींगचे काम सध्या सुरू आसुन त्या बांधकामाच्या साईटवर काम करणारे मजुर वास्तव्यास असुन त्यातील एका मजुराची पाच वर्षाची मुलगी खेळताना ईमारतीच्या डक्ट मध्ये पडुन गंभीर जखमी झाली होती. त्या अत्यवस्थ मुलीवर वाल्हेकरवाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दि. 30 आॅगस्ट रोजी वाल्हेकरवाडी येथील खाजगी रुग्णालयातुन त्यख मुलीला पुण्यातील धायरी येथील नवले हाॅस्पीटल मध्ये उपचारासाठी हलविण्यात आले होते. शेवटी तिन दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या या चिमुरडीची दि. 31 आॅगस्ट रोजी सायंकाळी प्राणज्योत मालवली या बांधकाम साईटवर सुरक्षेच्या दृष्टीने जाळ्या व उपाययोजना नसल्याने  हा अपघात घडला असुन संबधीत कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed