पुणे: येरवड्यातील लोकअदालत शिबिरात नागरिकांची गर्दी; चलन सवलतीसाठी लांबच लांब रांगा; टोकन वितरणावर प्रश्नचिन्ह – व्हिडिओ

पुणे : येरवडा येथील वाहतूक पोलिस कार्यालयात सुरू असलेल्या लोकअदालत शिबिराला नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. प्रलंबित वाहतूक चलनावर सवलत मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने वाहनचालक हजेरी लावत आहेत. मात्र, उपस्थित नागरिकांनी कमी टोकन वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
पहा व्हिडिओ
या शिबिरात येणाऱ्यांना टोकनच्या आधारेच सेवा दिली जात असल्याने अनेकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत आहे. नागरिकांची संख्या जास्त असून टोकनची संख्या मर्यादित असल्यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकअदालत शिबिर १३ सप्टेंबर (शनिवार) पर्यंत दररोज सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत सुरू राहणार आहे. या कालावधीत वाहनचालकांना त्यांच्या थकबाकी वाहतूक चलनांवर दंडात सवलत घेण्याची संधी मिळणार आहे.
वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आणि सवलतीच्या या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.