पिंपरी भाट नगरात गांजाचा धंदा सुरू?
नागरिकांकडून पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह

पिंपरी : पिंपरीतील भाट नगर परिसरात काही व्यक्तीकडून गांजाचा अवैध व्यापार सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात रेखा इंदुलकर आणि दीपक इंदुलकर या दोघांवर गांजाचा धंदा चालविण्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिस प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.

परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे की, गेल्या काही महिन्यांपासून या भागात नशेचे प्रमाण वाढले आहे. तरुण वर्गाच्या हातात सहजपणे गांजा पोहोचत असल्याने पालकांतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गांजाचा वास परिसरभर पसरत असून, नागरिकांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात अनेकदा तक्रारी केल्याचे समजते. तरीदेखील कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

“दररोज गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या नजरेत हा प्रकार का येत नाही? स्थानिक गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थविरोधी पथक काय करत आहेत?” असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी गांजाच्या धंद्याबाबत माहिती गोळा करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.


Spread the love

You may have missed