येरवडा : कॉमरझोन आयटी पार्कमध्ये आग, अग्निशमन दलाचा जलद प्रतिसाद – व्हिडिओ

पुणे : येरवड्यातील कॉमरझोन आयटी पार्कच्या सहाव्या मजल्यावर आज सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले व अवघ्या ३० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
पहा व्हिडिओ


सुदैवाने या आगीत कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही. आग कशामुळे लागली याबाबतचे निश्चित कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अग्निशमन दलाच्या जलद प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली असून, आयटी पार्क परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.