येरवडा: नेताजी शाळेजवळ धोकादायक चेंबर झाकणामुळे नागरिक हैराण; पालिकेकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी; इमाम शेख – भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष

पुणे : नेताजी शाळेजवळील दत्त मंदिर परिसरात रस्त्यावरील चेंबरचे झाकण वारंवार तुटत असल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण होत आहे. या ठिकाणी शाळकरी मुले, वृद्ध नागरिक व स्थानिक लोक जीव मुठीत धरून प्रवास करीत असल्याचे चित्र समोर आले आहे.
स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतरही केवळ तात्पुरते उपाय केले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी आणि किमान दोन ते तीन वर्षे कोणताही त्रास होणार नाही, अशा प्रकारचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष (येरवडा-फुलेनगर मंडल) ईमाम भाऊ शेख यांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे.
पहा व्हिडिओ
“सतत झाकण तुटल्यामुळे वाहतूक खोळंबा होतो, अपघाताची शक्यता वाढते. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी तर हा मुद्दा अधिक धोकादायक ठरतो. पालिकेने तातडीने ठोस कारवाई करणे गरजेचे आहे,” असे शेख यांनी नमूद केले.