येरवडा : तारकेश्वर डोंगरामागील रस्त्यावर रिक्षा व दुचाकीची जोरदार धडक; नागरी सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

0
IMG_20250630_234204.jpg

पुणे, प्रतिनिधी
येरवडा परिसरातील तारकेश्वर डोंगरामागील रस्त्यावर आज सकाळी आठ वाजता रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात जोरदार धडक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ही घटना संभाव्य मोठ्या अपघाताचा इशारा देणारी ठरली आहे.

सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, तेथे जवळच शाळा व राजीव गांधी रुग्णालय आहे. मात्र तरीही या रस्त्यावर गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंग किंवा अन्य कोणतेही सुरक्षा चिन्ह नाही. त्यामुळे नागरिकांना रस्ता पार करताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पहा व्हिडिओ

या संदर्भात शिवसेना प्रभागप्रमुख मा. सुहास कांबळे यांनी आठवडाभरापूर्वीच प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यावरील अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेची माहिती दिली होती. मात्र, अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

“सदर ठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक, झेब्रा क्रॉसिंगसारखी साधनं बसवण्यात यावीत, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,” अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आता तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

Spread the love

Leave a Reply

You may have missed